Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमदोघा सायकल चोरांना पेठ बीड पोलिसांनी घेतले ताब्यात

दोघा सायकल चोरांना पेठ बीड पोलिसांनी घेतले ताब्यात


बीड (रिपोर्टर)- घरासमोर लावलेल्या सायकल चोरून नेणार्‍या दोघा जणांना पेठ बीड पोलिसांनी सायकलसह रात्री ताब्यात घेतले.
दारासमोरून सायकल चोरी जाण्याच्या घटना पेठ बीड भागात मोठ्या प्रमाणात घडतात, मात्र सायकल चोरीला गेली म्हणून कोणी तक्रार द्यायला जात नाही. काल साडेपाच वाजता पेठबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विप्रनगर येथील अग्रवाल यांनी त्यांच्या दारात लावलेली सायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली म्हणून पेठबीड पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तेथील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सायकल नेताना दोन तरुण त्यामध्ये आढळून आले. पोलिसांनी त्या दोन तरुणांना रात्रीच साडेआठ वाजता ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सायकली जप्त केल्या आहेत. पोलिसांनी सायकल चोर पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर माऊलीनगर येथूनही काल एक जणाची सायकल चोरीस गेली होती. त्यानेही आज पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आकाश नामदेव आखाडे (रा. रामतीर्थ नाका) व निलेश रघूनाथ नरवडे असे चोरट्यांचे नाव आहे. ही कारवाई पीएसआय राजेंद्र बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. सौंदरमल, पो.ना. जगताप, गुरखुदे, ओव्हाळ, दरेकर यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!