Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईशासकीय जागेवरील अतिक्रमण कायम करा

शासकीय जागेवरील अतिक्रमण कायम करा


गेवराई न.प.समोर धरणे
गेवराई (रिपोर्टर) दि.१० डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गेवराई नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. युवक कॉंग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ऍड.श्रीनिवास बेदरे व कडूदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सुरू असून यामध्ये प्रमुख मागण्या गेवराई शहरातील सरकारी जागेवरील पात्र अतिक्रमणे कायम करा व त्यांना पीटीआर द्या. गेवराई शहरातील सरकारी आरक्षित जागेवरील अतिक्रमण कायम करण्यासाठी संबंधित शासकीय आरक्षण रद्द करा तसेच गेवराई शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी कर्तव्यात कसून करणार्‍या बेजबाबदार अधिकार्‍यावर कारवाई करा. या सर्व मागण्या घेऊन गेवराई शहरातील अतिक्रमण धारकांना मालकी हक्क मिळावा यासाठी आज दि.१० डिसेंबर या जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी कडूदास कांबळे,ऍड श्रीनिवास बेदरे यांच्यासह सोनाजी कारके,किरण अजबकर,शेषेराव सदाफुले, मन्सूर सय्यद,बळीराम गिराम,विष्णू हातगळे, रिता बोसले,रविंद पाटोळे,गुंजाळ विलास,तुकाराम खरात,बाबुराव पोटभरे, अर्जुन सुतार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाला राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी, बीड जिल्हा युवक कॉंग्रेस,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवा दल, महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समिती, असंघटित कामगार कॉंग्रेस समिती, झोपडपट्टी हक्क संघर्ष समिती गेवराई यांच्यासह आदींचा सहभाग आहे.

Most Popular

error: Content is protected !!