बीड(रिपोर्टर): बीड शहरामध्ये विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब आहे. नागरी समिस्यांकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करू लागले. नाल्या, रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यासह अन्य समस्यांनी शहराला घेरलेले आहे. शहरवासियांना तात्काळ सुविधा उपलब्द करून द्याव्यात, यासाठी आज शिवसंग्रामच्या वतीने नगरपालिका कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी शिवसंग्रामचे शेकडो कार्यकर्ते उपस्तित होते. हे आंदोलन ज्योतीताई मेटे यांच्या नेतृत्वाखाली झाले. मेटे व कार्यकर्त्यांनी सीओंकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
बीड शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही. काही भागाला पंधरा दिवसाला तर काही भागात महिन्यालाही पाणी मिळत नाही. पाण्याअभावी नागरीकांचे प्रचंड हाल होऊ लागले. पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा, शहरातील मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, स्वच्छतेकडे न.प.ने लक्ष द्यावे, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ते तात्काळ बुझविण्यात यावे, नाल्यांची साफसफाई करावी, शहरातील स्ट्रीट लाईट सुरू करावी यासह इतर मागण्यांसाठी आज शिवसंग्रामने न.प. कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. हे आंदोलन ज्योतीताई मेटे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी जिल्हाप्रमुख काशीद, अनिल घुमरे, सुहास पाटील, मनोज जाधव, शेषेराव तांबे, मनिषा कुचकर, गोपीनाथ देशपांडे, बहीर पांडुरंग, कांबळे सुशील, समर्थ शिंदे, कैलास माने यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. आंदोलन सुरू असताना मुख्याधिकारी मात्र त्याठिकाणी उपस्थित नव्हते. तब्बल दीड तासानंतर मुख्याधिकारी त्या ठिकाणी आले व नंतर निवेदन स्वीकारले.