वस्तीशाळांना इमारत कधी बांधून दिली जाणार
बीड (रिपोर्टर): ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण विभागाकडे शिक्षण विभागाचे सरळ सरळ दुर्लक्ष होत आहे. शिक्षण विभागातील अनेक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील 98 वस्तीशाळांना इमारत नसल्याने या वस्ती शाळा इतर ठिकाणी भरत आहेत. राज्य सरकारने वस्ती शाळांना इमारत बांधून देण्याची मागणी केली जाऊ लागली.
बीड तालुक्यातील 28, केज तालुक्यातील 17, परळी तालुक्यातील 12, माजलगाव तालुक्यातील 11, गेवराई तालुक्यातील 11, अंबाजोगाई तालुक्यातील 6, शिरूर 5, पाटोदा तालुक्यातील 3, धारूर 3, आष्टी आणि वडवणी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण 98 जिल्हा परिषद वस्तीशाळा इमारतीविना आहेत. या वस्तीशाळांना नवीन इमारत कधी बांधून दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इमारतीविना असलेल्या वस्तीशाळा आष्टी तालुक्यातील जि.प.प.प्रा.शा.खेडकर गोठे,अंबेजोगाई तालुक्यातील एकुण 6 ( चनई तांडा, बरड वस्ती,लोखंडी सावरगाव विट भट्टी परीसर दवाखाना , भीमाई वस्ती,उघडे वस्ती वरवंटी, कुसळवाडी तांडा नं .2.
बीड तालुक्यातील 28 (गवळवस्ती खापर पांगरी, आसराई वस्ती नाळवंडी, पवार वस्ती काळेगाव,खांडे वस्ती म्हाळसजवळा,मस्कर वस्ती सुर्याची वाडी,खोले वस्ती आहेर धानोरा,कोटुळे वस्ती वरवटी, घुमरे वस्ती वरवटी, आगम वस्ती पिंपरगव्हाण,बारकुल वस्ती गौळवाडी, खांडेकर वस्ती पाली, इस्मालेदरा वस्ती पाली, जगताप वस्ती कर्झणी,गौळी वस्ती पालदरा,बोरबन वस्ती पिंपळवाडी,तांबारे वस्ती साक्षाळपिंप्री,हिंगे वस्ती साक्षाळपिंप्री,नरनाळे वस्ती इट,माने वस्ती लिंबा,बेलगाव वस्ती बेलगाव, विठ्ठलवाडी नागझरी, मुंडे वस्ती ताडसोन्ना,क्रांती वस्ती ताडसोन्ना, जाधववस्ती वांगी, महादेव दरा तांडा मैंदा, मुंडे वस्ती बोरदेवी, सानप वस्ती रूद्रापुर .
धारूर तालुक्यातील 3 (आनंद नगर,संचगाणी तांडा,खोडस तांडा).
केज तालुक्यातील 17 ( यमाई वस्ती,चिंचकर वस्ती,डांगे वस्ती, विठ्ठल वस्ती,येडका वस्ती,गदळे वस्ती, हनुमान वस्ती, हनुमान वस्ती तुकाचीवाडी, गजानन नगर, विठ्ठल नगर वस्ती, भालगाव नं 1 ऊर्दू, चिंचोली माळी ऊर्दू, मेटे वस्ती,घाटे वस्ती,सोनदरा वस्ती,हरगड वस्ती,लहुरी ऊर्दू .
गेवराई तालुक्यातील 11 ( मोरे वस्ती राजपिंपरी, शेंबडे वस्ती शेकटा, गदाडे वस्ती शेकटा, हनुमान नगर धुमेगाव,नालसाहेब वस्ती नंदपुर, काटकर वस्ती कुंभार वाडी, लक्ष्मण वस्ती खडकी, शिंदे वस्ती खडकी, धनगर वस्ती गाडेवाडी,अंकोटा ,देवीतांडा तलवडा.
परळी तालुक्यातील 12 ( सारडाव वस्ती, डाव वस्ती धर्मापरी, मणियार धर्मापरी, महादेव वस्ती, जांभुळ दरा तांडा, शिवाजीनगर सिरसाळा, विट भट्टी सिरसाळा,रायणार सिरसाळा,नेहरू नगर सिरसाळा, राधानगर सिरसाळा,हेमा नाईक तांडा,महोदरा तांडा.
.पाटोदा तालुक्यातील 3 (भांगे वस्ती,टोकवाड वस्ती,तांबे वस्ती).शिरूर तालुक्यातील 5 ( महात्मा फुले नगर, विठ्ठल वस्ती, शिंदे वस्ती झापेवाडी,पांढरे वस्ती शिंगारवाडी, रूताळे वस्ती .
वडवणी तालुक्यातील 1 वंजारवाडी वस्ती
माजलगाव तालुक्यातील 11 ( हनुमान नगर तांडा, राठोड वस्ती,येला तांडा, इंदिरा नगर राजेगाव, अहिल्या नगर, माऊली वसाहत, झोपडपट्टी वारोळा,नाईक नगर, झुंझुर्डी तांडा,नागडगाव तांडा, हनुमान नगर टाकरवण
एकुण 98 जिल्हा परिषदेच्या शाळा ईमारत विरहीत आहेत.