बीड, (रिपोर्टर)ः- दोन दिवसापुर्वी राज्याच्या गृहविभागाने बीडच्या पोलीस अधिक्षक पदी अविनाश बारगळ यांची नियुक्ती केली होती. आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. तब्बल वीस महिने नंदकुमार ठाकूर यांनी बीडचे पोलीस अधिक्षक पद संभाळल्यानंतर बारगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अविनाश बारगळ यांनी यापुर्वी अमरावती पोलीस अधिक्षकपदी कार्यरत होते. बारगळ राज्य पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. गेल्या पाच वर्षापुर्वी त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे. अमरावती या ठिकाणी त्यांनी पोलीस अधिक्षक म्हणुन अतिशय चांगले काम केले आहे. लोकसभा निवडणूकीनंतर ठाकुर यांच्या बदलीच्या चर्चा होवू लागल्या होत्या. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर बीड शहरातील जाळपोळ आणि लोकसभा निवडणूक या दोन्ही बाबी ठाकूर यांनी हाताळलेल्या आहेत. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका आहेत. बीड जिल्हा तसा राजकीय दृष्टया संवेदनशिल जिल्हा आहे. या पार्श्वभुमीवर बारगळ यांची बीड येथे झालेली पदसस्थापना आव्हानात्मक आहे. पोलीस सेवेतील त्यांचा दिर्घ अनुभव पाहता. बीड येथील सामाजिक, आर्थिक, राजकीय संवेदनशिल विषय बारगळ हे कसे हाताळतात हे लवकरच करून चुकेल. बीड जिल्ह्यात अनेक पदसंस्थांनी कोट्यावधी रूपयांचे आर्थिक गुन्हे घडलेले आहेत. पोलीसांनी या पतसंस्था गुन्हेगारांना अटकही केली आहे. काहींच्या संपत्ती जप्त करण्याची कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. काल पासून बीडयेथील ज्ञानराधा पतसंस्थेच्या अनेक मालमत्ता बाबत इडीनेही छापेमारी सुरू केली आहे. या सर्वपार्श्वभुमीवर बारगळ यांना जिल्ह्यात आव्हानात्मक कामे आहेत.