Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडमाजलगावफोन करूनही जयमहेश कारखान्याने ऊस घेतला नाही, आजारी असलेल्या शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

फोन करूनही जयमहेश कारखान्याने ऊस घेतला नाही, आजारी असलेल्या शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू


माजलगाव (रिपोर्टर)- जयमहेश सहकारी साखर कारखान्याने उसाची तोड लवकरात लवकर आणावी, अशी मागणी एका ४२ वर्षीय शेतकर्‍याने केली होती मात्र उसाची तोड शेवटी आलीच नाही. आजारी असलेल्या या शेतकर्‍याचा रात्री मृत्यू झाला. कारखानदार किती निरढावलेले आहेत, ते स्थानिक ऊस घेण्याऐवजी बाहेरचा ऊस आणण्यात धन्यता मानत असून अशा कारखानदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.


गेटकिनच्या उसासंदर्भात गंगाभीषण थावरे यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये रामेश्वर सोपान दातार (रा. आनंदगाव) या शेतकर्‍याने आजारी असताना सहभाग घेतला होता. या शेतकर्‍याकडे सात ते आठ एकर ऊस आहे. ऊस घेऊन जावा म्हणून शेतकर्‍याने दोन दिवसांपूर्वी जयमहेश कारखान्याशी संपर्क साधला होता मात्र कारखान्याने याची दखल घेतली नाही. या आजारी शेतकर्‍याचा रात्री मृत्यू झाला. सदरील शेतकर्‍याचा ऊस कारखान्याने का घेतला नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत कारखान्याविरोधात कारवाई करण्याची मागणी गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!