केज (रिपोर्टर): मस्साजोग येथे असलेल्या एका लॉजमध्ये 25 वर्षीय तृतीयपथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
नगर येथील 25 वर्षीय तृतीयपंथ केज तालुक्यातील मस्साजोग येथील अजिंक्य बिअरबार अॅन्ड लॉजिंगमध्ये राहत असते. या तृतीयपंथाने लॉजच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलीस निरीक्षक महाजनसह आदींनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सदरील तृतीयपंथी हा नगर येथील असल्याचे समोर आले आहे.