Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईमंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांची सोलर पंपाची फिटिंग तात्काळ पूर्ण करा नसता कंपनीच्या नावाने...

मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांची सोलर पंपाची फिटिंग तात्काळ पूर्ण करा नसता कंपनीच्या नावाने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार – आ.पवार

महावितरण कार्यालयात बैठक घेऊन घेतला आढावा

गेवराई (रिपोर्टर) शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सोलार पंप योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यातील काही प्रमाणात फिंटिंगचे काम पूर्ण झाले आहेत. मात्र मंजुरी मिळवूनही कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या फिटिंग बाकी आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात मंजूर असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या फिटिंग पूर्ण करा अशा आ.पवार यांनी संबंधित कंपन्यांचे अधिकारी व प्रतिनिधी यांना दिल्या. दरम्या

न ज्या कंपन्या काम करत नाहीत त्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यातील सोलर पंप फिटिंग बाबत आ.पवार यांनी महावितरण कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी अभियंता शिवलकर,बाळासाहेब गायकवाड, विविध सोलार कंपनीचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी चालू वर्षात तालुक्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी जास्तीचा विद्युत पुरवठा आवश्यक आहे. दरम्यान यासाठी शासनाच्या वतीने सर्वत्र सोलार सिस्टमची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

यामध्ये तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. यातील अनेक कंपन्यांनी आपल्या फिटिंगचे काम प्रगतीपथावर आहेत तर काही कंपन्यांनी अद्याप एकही फिंटिंगचे काम केलेले नाही. त्यामुळे मंजूर असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंप दोन महिन्यांच्या आत फिटिंग झाले पाहिजेत असे आदेश यावेळी उपस्थित कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधीना दिले.

तालुक्यात आतापर्यंत एकूण मंजूर – 4 हजार 669 पैकी 2 हजार 401 पंप फिट झाले असून काहींचे काम चालू असल्याचे संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून तात्काळ प्रश्न मार्गी लावा नसता तुमच्यावर कारवाई करण्यास भाग पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!