Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडजिल्हा रुग्णालयाचा कारभार, सव्वा दहाला इंटरव्ह्यु, दहाला कॉल केला

जिल्हा रुग्णालयाचा कारभार, सव्वा दहाला इंटरव्ह्यु, दहाला कॉल केला


वैजापूरहून उमेदवार पंधरा मिनिटात बीडला कसा येणार?
एक दिवसआधी पत्रव्यवहार का केला नाही?
बीड (रिपोर्टर)- जिल्हा रुग्णालयामध्ये काही जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. वैजापूर येथील पुनम रावसाहेब आहिरे या मुलीने सायकालॉजिस्टसाठी अर्ज दाखल केला होता. त्यासाठी आज मुलाखत होती. मुलाखतीपूर्वी पंधरा मिनिट आधी रुग्णालय प्रशासनाने आहिरे यांना कॉल केला. पंधरा मिनिटात आहिरे वैजापूरहून बीडला कशा येतील? जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा कॉल केला का? असा प्रश्‍न उपस्थित होत असून मुलाखतीसाठी पत्रव्यवहार किंवा मेलद्वारे का संपर्क साधला नाही? असा संतप्त सवाल उमेदवाराने उपस्थित केला.
जिल्हा रुग्णालयामध्ये सायकालॉजिस्टसाठी सध्या जागा भरावयाच्या होत्या, त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. वैजापूर येथील पुनम रावसाहेब आहिरे या उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. यांच्यासह अन्य काही उमेदवाांनीही आपले अर्ज दाखल केले होते. त्यासाठी आज रुग्णालयामध्ये तोंडी मुलाखत घेण्यात येणार असल्याने मुलाखतीपूर्वी पंधरा मिनिट आधी भ्रमणधवनीवरून आहिरे यांना कॉल करण्यात आला की, आज तुमची मुलाखत आहे. मुलाखतीपुर्वी पंधरा मिनिट आधी कॉल करणे हे कुठल्या नियमात बसणारे आहे. पंधरा मिनिटात आहिरे ह्या वैजापूरहून बीडला कसे येतील? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मुलाखतीसाठी मेल किंवा पोस्टाद्वारे संपर्क न साधता केवळ मुलाखतीआधी पंधरा मिनिटपुर्वी भ्रमणध्वनीवरून संपर्क करणे म्हणजे जिल्हा रुग्णालयाचा हा अनागोंदी कारभारच आहे. याबाबत संबंधीत उमेदवारात संताप व्यक्त केला जात असून पुन्हा तारीख देऊन मुलाखत घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!