Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमपाणी घेत असताना महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

पाणी घेत असताना महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू


बीड (रिपोर्टर)- विहिरीतून पाणी घेत असताना एका ३२ वर्षीय महिलेचा पाय घसरल्याने सदरील महिला पाण्यात बुडून मरण पावली. ही घटना आज सकाळी पालवण चौकातील मस्के वस्ती येथे घडली.
मंदाकिनी कृष्णा उबाळे (वय ३२) ही महिला आज सकाळी शौचास गेली होती. या वेळी तेथीलच असलेल्या एका विहिरीतून पाणी घेत असताना तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. सदरील मृतदेह शोधण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण ठाण्याचे पो.कॉ. शेलार हे करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!