Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडखा. शरद पवार उद्या बीडच्या पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधणार

खा. शरद पवार उद्या बीडच्या पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधणार

खा. शरद पवार उद्या बीडच्या पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधणार
पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी भवनात उपस्थित रहावे -आ. संदीप क्षीरसागर
बीड (रिपोर्टर)- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे उद्या वाढदिवसादिनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असल्याने सकाळी दहा वाजता सर्व पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी भवन या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. या वेळी दस्तुरखुद्द राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती आहे. याच वेळी रक्तदानासह वृक्षारोपणचा कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा उद्या वाढदिवस. त्या निमित्ताने राज्यभर रक्तदानासह वृक्षारोपण आणि आदी सामाजिक उपकरणांसह हा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा होणार आहे. बीड शहरासह जिल्ह्यातही वाढदिवस रक्तदान आणि वृक्षरोपणाने साजरा होत असन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. उद्या सकाळी १० वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा शरद पवार हे थेट राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या वेळी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांचे म्हणणे ते ऐकून घेणार आहेत.पालकमंत्री धनंजय मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. त्यासाठी उद्याच्या या व्हिडिओ कॉन्फरन्स संवादासाठी पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्तित राहण्याचे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. या वेळी रक्तदान वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!