हा बंद विकृती विरुद्ध संस्कृतीचा
बंद दुपारी दोनपर्यंत; रेल्वे, बससेवा बंद ठेवा
मुंबई (रिपोर्टर): उद्याचा बंद हा विकृतीविरुद्ध संस्कृती असल्याचे सांगत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी बदलापूर येथील चिमुरडीवर अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आल्याचे म्हटले. उद्याचा बंद सर्व नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा वगळून दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. हा बंद राजकारण करण्यासाठी नाही, गंभीर प्रकरणाकडे लक्ष न वेधणार्या व्यवस्थेला टाळ्यावर आणण्यासाठी असल्याचे सांगून बंदमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असेही ठाकरेंनी म्हटले तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या या बंदविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरू असल्याचे सांगण्यात येते.
बदलापूरमध्ये एक चार वर्षाच्या आणि दुसर्या सहा वर्षीय मुलीवर तेथील सफाई कामगाराने बलात्कार केला. सदरचे प्रकरण हे शाळेने दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तर पोलीस यंत्रणेने या प्रकरणी वेळीच गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे सरकार विरोधात संतापाची लाट असून आंदोलनेही सुरू आहेत. त्यात आंदोलकांवर गुन्हे दाखल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकांच्या संतापाला राजकीय म्हटल्याने हे प्रकरण अधिकच पेटले आहे. महाविकास आघाडीने उद्या बंदचे आवाहन केले आहे. आज या प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उदद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असल्याचे म्हटले. आपली मुलगी शाळेत सुरक्षित आहे का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. आपली मुलगी कार्यालयात सुरक्षित आहे का? असा प्रश्न माता-भगिनींना पडला आहे. याला वाचा फोडण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. आम्ही विकृती विरोधात बंद पुकारलेला आहे. बंदचे यश – अपयश हे विकृती आणि संस्कृतीचे असणार आहे. माता-भगिनींना सर्वांची िचिंता आहे हे सरकारला दाखवून दिले पाहिजे, असे म्हणत उद्यघाचा बंद फक्त महाविकास आघाडीचा नाही तर सर्व नागरिकांच्या वतीने पुकारला गेला आहे. जात-धर्म-पंथ-भाषा या सीमा ओलांडून सर्वांनी सहभागी व्हावे, कडकडीत बंद असला तरी अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहे. सणासुदीचे दिवस असल्याने 24 ऑगस्टचा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत पाळावा, असे उद्धव ठाकरेंनी आवाहन केले. बंद दरम्यान दुकाने, रेल्वे, बससेवा बंद ठेवायला हरकत नलस्याचे सांगून जास्तीत जास्त नागरिकांनी बंदमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.