Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडवाढत्या पेट्रोल,डिझेलच्या किंमती विरोधात खांडेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे तीव्र आंदोलन

वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या किंमती विरोधात खांडेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे तीव्र आंदोलन

वाढती महागाई आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या
विरोधात शिवसेनेकडून तीव्र निषेध
(फोटो  )
बीड,दि.12(प्रतिनिधी):-संपुर्ण देशभरात दररोज वाढणार्‍या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने जनता हैराण झाली आहे. केंद्र सरकारकडून वाढवण्यात येणार्‍या पेट्रोल,डिझेलच्या किंमतीच्या विरोधात  आणि दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत डोक्यावर पडल्यासारखे वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली नगर नाका परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने इंधनाच्या किंमती कमी कराव्यात आणि मंत्री दानवेंनी जाहिर माफी मागावी आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा नसता अधिक व्यापक स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला आहे.

sene khande


‘अच्छे दिन येणार ’ अशा भुलथापा देणार्‍या केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्किल केलेले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकार कोणतीही रोखथाम करताना दिसत नाही. उलट महागाई वाढतच जाताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर आता शंभर रुपयाच्या जवळ गेल्या आहेत. इंधनाच्या किंमती आतापर्यंत कधीही एव्हढ्या वाढलेल्या नव्हत्या. आज पेट्रोल 92 रुपये तर डिझेल 80 रुपये एव्हढे झाले आहे. केंद्र सरकारकडून वाढवण्यात येणार्‍या इंधनाच्या किंमती विरोधात आणि दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना बाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनामागे पाकीस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब तर्क लावला त्याच्या विरोधात  आज शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली  नगर नाका परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना पदाधिकार्‍यांनी महागाईचा उडाला भडका, केंद्र सरकारला द्या तडका, रावसाहेब दानवेंचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, देशात राष्ट्रद्रोही कोण आहे? रावसाहेब दानवे चोर आहे.  दानवे तात्काळ राजीनामा द्या, शेतकरी आहे सकाळ जनांचा अन्नदाता तोच आहे खरा देशाचा भाग्यविधाता अशा घोषणा दिल्या.

sene khande2


या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, शिवसेना युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर कृ.उ.बा.चे माजी सभापती अरुण नाना डाके, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते ,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अ‍ॅड.संगिताताई चव्हाण, चंद्रकलाताई बांगर, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ पिंगळे,तालूका प्रमुख गोरख सिंघन,उपजिल्हाप्रमुख सुमनताई गोरे, शहर प्रमुख सुनिल सुरवसे, मशरु पठाण, रतन गुजर, रामसिंग टाक,अ‍ॅड.राजेंद्र राऊत,फरजाना शेख, सखाराम देवकर,कल्याण कचवट,भगिरथी जाधव,शामल पवार,शारदा डुलगच,चंद्रशेखर कवडे, सारीका काळे, सारीका डोंगरे, संगिता वाघमारे, रेखा वाघमारे, शेख रशिदभाई, शेख कामरान, शेख तौफीक,गोरक्षनाथ कदम, अशोक जगताप, गणेश वळे, मसुराम मोरे, नितीन देवगुडे, गणेश राऊत, ललित आडाणे, ज्ञानेश्वर चव्हाण, आकाश केंद्रे, विजय काटे, शिवराज शिंदे, काकासाहेब जाधव, गणेश मस्के, युवराज मस्के, गणेश जगताप,रमेश कराडे,बाळू घोलप, ऋषीकेश दहिवाळ आदिसह शिवसैनिक सहभागी झाले होते.  

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!