बीड (रिपोर्टर): स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, उत्पादन खर्चाच्या दीडपट किफायतशीर हमीभाव द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सणासुदीच्या दिवसातही आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये महिलांचाही सहभाग आहे.
केंद्र सरकारने शेतकर्यांच्या हितासाठी योग्य ते निर्णय घ्यावेत, उत्पादन खर्चाच्या दिडपट किफायतशीर शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, कापूस, सोयाबीन पिकांनाजाहीर केलेल्या अनुदानासाठी लावलेली ई पीक पाहणीची अट रद्द करून प्रत्येकी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात यावी, या सह इतर मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहेत, सणासुदीच्या दिवसातही किसान सभेचे आंदोलन सुरू आहे.