मंदिरामध्ये पत्ते खेळणार्यास पकडले
बीड (रिपोर्टर): बीड ग्रामीण पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे. पांगरबावडी परिसरात बिस्लेरी बाटलीत सिंदी दारू विक्री करताना पोलिसांनी पकडले आहे तर कोल्हारवाडी येथील देवीच्या मंदिरामध्ये असलेल्या एका रुममध्ये पत्ते खेळताना जुगार्यांना पकडण्यात आले. या दोन्ही प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
पांगरबावडी परिसरात शेख हुसेन शेख बडेसाब (वय 45 वर्षे) हा बिस्लेरी बॉटलमध्ये सिंदी दारू विकत असे. बीड ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून 34 बॉटल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. तर कोल्हारवाडी येथील देवीच्या मंदिरामध्ये एका रुममध्ये पत्ते खेळताना विश्वंभर हाडुळे, शिवाजी घल्लाळ, महादेव निर्धार, केरबा शिंगण, माणिक घल्लाळ, रामचंद्र रांजवण, गजानन जाधव, सुंदरराव घल्लाळ, साकेराम धरणे, शंकर घल्लाळ, लक्ष्मण भोसल सह इतरांना रंगेहात पकडले. या दोन्ही कारवाया पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, डीवायएसपी गोल्डे, पो.नि. बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे, दराडे, दीपक राठोड, अमोल शिंगणे, मोराळे, सानप, जायभाये, मस्के यांनी केली.