Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडशरदचंद्र पवार म्हणजे विश्‍व विद्यापीठच मुंबईच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बीडहून बोलले

शरदचंद्र पवार म्हणजे विश्‍व विद्यापीठच मुंबईच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बीडहून बोलले

मराठवाड्याचं प्रतिनिधीत्व करत या विद्यापीठात सर्वांचे प्रश्‍न सुटतात म्हणाले
बीड (रिपोर्टर):- विद्यापीठात ज्याप्रमाणे प्रश्‍नाची सोडवणूक केली जाते त्याच प्रमाणे देशातील आणि राज्यातील शेतकरी, कामगार, ऊस कारखानदार, उद्योगपती या समाजातील कोणत्याही घटकाला पडलेल्या प्रश्‍नाची सोडवणूक करणारं विश्‍व विद्यापीठ म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. येथे बसलेल्यापैकी मला माहित नाही देव कोणी बघितला आहे की नाही पण मी मात्र ज्या माणसामध्ये देव बघितला आहे असे हे देशातील सर्व प्रश्‍नाची सोडवणुक करणारे आग्रगण्य नेतृत्व म्हणून ओळख असणारे शरद पवार यांच्यात बघितले जाते असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मराठवाड्याचं प्रतिनिधीत्व करत धनंजय मुंडेंनी आपल्या खास शैलीत भाषण केले आणि मराठवाड्याचे प्रतिनिधीत्व केले.

1 1

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने व्हर्च्युअल रॅलीमध्ये बीड येथील राष्ट्रवादी भवनातून धनंजय मुंडे सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. देशातील कोणत्याही घटकाचा अभ्यास, कुठल्याही क्षेत्रातील निर्माण होणार्‍या अडचणी, प्रश्‍न याची सोडवणूक फक्त शरद पवारच करू शकतात अशी खात्री देशातील सामान्य ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच आहे. मी एका कार्यक्रमात सहभागी होत असतांना त्यावेळेस मला एका पत्रकाराने प्रश्‍न विचारला की, भारतातील वर्तमान लोकशाहीबद्दल आपण काही बोलाल का? त्यावेळेस मी म्हणालो की, राज्यातील ६४ आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, ५४ आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा आमदार उपमुख्यमंत्री होवू शकतो आणि ४४ आमदार ज्यापक्षाचे आहेत त्या पक्षाचे आमदार मंत्री होवू शकतात आणि दुसर्‍या बाजुला १०५ आमदार ज्या पक्षाचे आहेत असा पक्ष विरोधी पक्षात बसतो ही किमया फक्त शरद पवार हेच करू शकतात आणि हीच लोकशाहीची वर्तमान स्थिती आहे. देशासह राज्यातील दलित असो, कामगार असो, महिलांचा प्रश्‍न असो, शिक्षण बाबतीतील प्रश्‍न असो, शेतकर्‍यांसंदर्भातला एखादा प्रश्‍न असो, एखाद्या उद्योगपतीचा प्रश्‍न असो कोणत्याही प्रश्‍नाची जाण आणि तो कसा सोडवायचा आणि ते कोण सोडवू शकतो याची खात्री याच समाजातील सर्व घटकातील लोकांना पवार साहेबांबद्दल आहे.

2


मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे ‘होत्याचे नव्हते करणे आणि नव्हत्याचे होते करणे’ हे फक्त करू शकतात शरद पवार. जे की त्यांनी वर्षभरापुर्वीच करू दाखवलेले आहे. गेल्या २५ वर्षापुर्वी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे भुकंप झाला होता आणि या भुकंपात दगड, माती, वीटा यांच्या ढिगार्‍यात माणसं अडकलेली होती. जीवाच्या आकंताने हंबरडा फोडत देवाचा धावा करत होते. देवा वाचव, देवा वाचव त्यावेळेस देवाने त्या वेळेस राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांना काही तासात देव माणुस म्हणून पाठवले होते आणि काही क्षणातच या मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या माणसांचे जीव वाचवायचे काम शरद पवार साहेबांनी करत किल्लारी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावाचे उत्तमरित्या पुर्नवसन केले होते. त्यामुळे देश आणि राज्य यांच्यामधील सर्व प्रश्‍न सोडवण्याबरोबरच प्रगतीच्या यशोशिखरावर पवार साहेब हेच घेवून जावू शकतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा एक पायीक म्हणुन मी जिल्ह्याच्या वतीने वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतो असे ही यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितले.बीड येथील व्हर्च्युअल रॅलीत राष्ट्रवादी भवनात धनंजय मुंडे यांच्या सोबत आ.संदिप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण सभापती बजरंग सोनवणेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धनंजय मुंडेंनी ‘त्या’ मुलीचे पालकत्व स्विकारले
अतिशय गरीब कुटुंबातील चार मुली, एकीला प्रवेश मिळाला बीडीएसला तर तीन मुलीला ऍडमीशन मिळते एम.बी.बी.एस.ला मात्र घरी तीन एक्कर शेती ती ही कोरडवाहू या मुलींचे शिक्षण कसे करायचे असा यक्ष प्रश्‍न पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथे वनवे कुटुंबियांना पडला आणि आज या मुली आई संगिता प्रभाकर वनवे यांच्या समवेत निकीता आणि प्रियंका या दोन मुली जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना शासकीय विश्रामगृह या ठिकाणी भेटल्या. मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता ज्या दोन मुलीचा प्रवेश एम.बी.बी.एसला झालेला आहे अशा दोन्ही मुलींचा वैद्यकीय शिक्षणाचा सर्व खर्च मुंडे यांनी स्विकारला आहे. मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता मी पुर्ण करतो तुम्ही काळजी करू नका असे शब्द मुलीच्या आईने ऐकताच आनंदाश्रु अनावर झाले.

Most Popular

error: Content is protected !!