Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeव्हिडिओVideo -आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच पेरे पाटील म्हणतात ग्रामपंचायतीत कश्या लोकांनी आले...

Video -आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच पेरे पाटील म्हणतात ग्रामपंचायतीत कश्या लोकांनी आले पाहिजे

बीड (रिपोर्टर): राज्यातील  ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर राज्यभरात गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची लगबग सुरू झाली आहे अशा परिस्थितीत राज्य पातळीवर आणि देशपातळीवर गावाला एक नंबर मिळवून देणारे औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावचा विकास आणि गावचा सरपंच कसा असावा याबाबतचा एक व्हिडीओ सध्या व्हारल होत आहे. 


व्हिडिओ मध्ये पेरे पाटील म्हणतात दोन दिवसाची निवडणूक असते पण ते पाच वर्षे आपल्या सर्व भोगावं लागतं. या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की प्रत्येक ग्रामपंचायतचे आजपर्यंतचे 70 वर्षे फुकट गेले. त्यात लोकांच्या डोक्यात भ्रष्टाचार, पैसा खाणं हा विषय धरून जर कोणी निवडणूका लढवत असल तर अत्यंत चुकीचे आहे, म्हणून ज्याला वेळ आहे ज्याच्याकडे कुवत आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, शिक्षण आहे, आपल्या गावचे चांगले करण्याचे ताकद आहे अशाच लोकांनी या क्षेत्रात पुढं आलं पाहिजे. हवसे नवसे गवशांनी या क्षेत्रात येवू नये आणि गावचा नास करू नये. सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला मी कळकळीची विनंती करतो. ग्रामपंचायतचं सरपंच, सदस्य होणं हे सोपं आहे काम करणं खुप अवघड आहे त्याला अभ्यासच पाहिजे. गेली 25 वर्षे मी रात्रंदिवस काम करतो, मला अजूनही अर्धी ग्रामपंचायत कळाली नाही. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे ज्याला फुल टाईम द्यायचा आहे, ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, सगळी ताकद आहे, काही करायची इच्छा आहे, समाजसेवेची आवड आहे अशाच लोकांनी यामध्ये आलं पाहिजे. इतरांनी उगं भाऊबंदकी अथवा इतरांवरचा राग काढायचाय म्हणून या क्षेत्रात येणं अतिशय वाईट आहे. मी निवडून आल्यावर असे पैसे खाईल, इतके कमवील ही अपेक्षा ठेवणं हेही अत्यंत चुकीचं आहे. पैसा नक्कीच कमवायला पाहिजे माणसाने, उत्तम व्यवहारे जोडूनिया धन  असं तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. पैसा कमवा, कमवाबद्दल काही नाही, परंतू लोकांची अशी भावना झाली आहे की इथं निवडून आलं की पैसा कमवता येतो हे अतिशय वाईट आहे. अत्यंत वाईट शब्दात बोलायचं झालं तर बायकोतला आणि बहिणीतला ज्याला फरक कळत नसेल असे जर या क्षेत्रात उतरले गावचे आणि राज्याचे वाईट होईल आणि आपण वाईट दिशेने जात आहोत, म्हणून मी पुन्हा कळकळीची विनंती करतो हे क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे, पवित्र मंदिर, पवित्र काम आहे. पवित्र भावनेने इथं या आपल्या गावचा विकास करा असे या व्हिडीओमधून सरपंच भास्करराव   पेरे पाटील यांनी आवाहन केले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!