Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९४.६९, आज नव्या ३४ रुग्णांची भर

बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९४.६९, आज नव्या ३४ रुग्णांची भर


१६ हजार १४२ पैकी १५ हजार २८६ जणांनी केली कोरोनावर मात

बीड (रिपोर्टर)- गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात कमी प्रमाणात आढळत आहेत. मात्र आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकूण १६ हजार १४२ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी तब्बल १५ हजार २८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून पॉझिटिव्ह रुग्णांमधील ५१२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वाधिक असून तो ९४.६९ टक्के आहे. आज बीड जिल्ह्यात नव्या ३४ रुग्णांची भर पडली.


गेल्या दोन महिन्यात बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते.त यामुळे बीडमध्ये एकूण आकडा १५ हजाराच्या पुढे गेला आहे.

आरोग्य विभागाने घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णांची संख्या मोठी असून आतापर्यंत तब्बल १५ हजार २८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने आतापर्यंत १ लाख ६९ हजार ४१६ जणांच्या कोरोना टेस्ट केल्या असून यामध्ये १ लाख ५३ हजार २७४ जण निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला आज ४६८ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले.

यामध्ये ३४ जण बाधीत आढळून आले असून ४३४ जण निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई १०, आष्टी ३, बीड ९, धारूर, केज, परळी, पाटोदा, शिरूर प्रत्येकी एक तर माजलगावमध्ये ७ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!