Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडशिरूरहिंस्त्र प्राण्याने केली हरिणाची शिकार वन विभागाने केला पंचनामा

हिंस्त्र प्राण्याने केली हरिणाची शिकार वन विभागाने केला पंचनामा

हिंस्त्र प्राण्याने केली हरिणाची शिकार
वन विभागाने केला पंचनामा
तिंतरवणी (रिपोर्टर)- शिरूर तालुक्यातील तिंतरवर्णी परिसरात मृतावस्थेत हरिण आढळून आले. या हरिणाची शिकार हिंस्त्र प्राण्याने केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून घटनेची माहिती शिरूर वन विभागाला झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.


तिंतरवणी येथील भगवान खेडकर यांच्या शेतामध्ये मृतावस्थेत हरिण आढळून आले. याची माहिती उद्धव खेडकर यांनी शिरूर वन विभागाला दिल्यानंतर वनविभागाचे परजने हे घटनास्थळी आले होते. त्यांनी याचा पंचनामा करून हरिणाची बॉडी शवविच्छेदनासाठी बीडच्या पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठवून दिली होती.

सदरील या हरिणाला हिंस्त्र प्राण्याने मारले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!