परळी-गंगाखेड महामार्गावर घडली घटना; चारपेक्षा जास्त प्रवासी जखमी
परळी (रिपोर्टर) एसटी बस व खाजगी वाहतूक करणारी प्रवासी ट्रॅव्हल्स यांचा भीषण अपघात परळी गंगाखेड महामार्ग झाला असून यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहे ही घटना गुरुवार दिनांक 28 रोजी सायंकाळी दहाच्या सुमारास घडले असून काही जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले तर काहींना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परळी येथे आणण्यात आलेल्या तीन रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने आंबेजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहेत.
परळी येथून नागपूर येथे रवाना झालेली एमएच 20 बी एल 4074 व नांदेड येथून पुण्याकडे रवाना झालेली माऊली कृपा गंगाखेड येथील खाजगी ट्रॅव्हल एम एच 22- 3619 या वाहनांचा करम पाटी जवळ समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये एस.टी बस व ट्रॅव्हलचे मोठे नुकसान झाले असून या वाहनांमधून प्रवास करणारे अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या मधील काही प्रवाशी हे उपचारासाठी गंगाखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात रवाना केले तर 4 जणांना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. ज्यामध्ये रमेश ज्ञानोबा साळुंखे वय 45 तालुका औसा जिल्हा लातूर, बापू श्रीराम गीते वाहक वय 30 वर्ष रा.नंदागौल तालुका परळी वैजनाथ., संघपाल वैजनाथ रोडे रा.कनेरवाडी वय 45, सुरज कुमार वसंतराव शेळके रा.धारूर जिल्हा बीड आदींचा समावेश आहे. राज्य परिवहन महामंडळाचे वाहक बापू श्रीराम गीते यांनाही कपाळावर जखम झाल्याने तेही गंभीर स्वरूपाची जखमी आहेत. रमेश साळुंखे आणि संघपाल रोडे हे गंभीर जखमी आहे. दोघांनाही स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.