Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड होय मी महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी अहंकारी- मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

होय मी महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी अहंकारी- मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला


राजकीय हल्ले परतवत आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
बीड (रिपोर्टर)
महाविकास आघाडी सरकार आता पडेल, मग पडेल याकडे अनेक जण डोळे लावून बसले होते पण जागतिक आरोग्याच्या परिस्थितीचा सामना करत राजकीय हल्ले परतवत, विकास करत महाविकास आघाडी सरकारने वर्षपुर्ती केली. होय मी महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे, लोकांचे प्रश्‍न, महाराष्ट्राचा विकास हे करत असताना मला कुणी अहंकारी म्हटले तरी चालेल जनतेचा विकास करणं हा अहंकार आहे काय? तुम्ही आमचे प्रकल्प आडवायचे आम्ही तुमचे प्रकल्प आडवायचे यात लोकांचा विकास होतो काय? कांजूरमार्गला मेट्रो कारशेडचा निर्णय घेत सरकारने आरेचे जंगल वाचवले असं म्हणत कांजूर प्रकरण केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित बसून सोडवलं तर विरोधकांनाही याचं मी श्रेय देतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, राज्य सरकारने सांगितलेल्या प्रत्येक सूचनेचं जनतेने पालन केलं. आता हळूहळू परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात येणार्‍या साथीचे आजार पसरण्यास जनतेने पायबंद घातला. कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन केल्यानेच आपण कोरोना रोखू शकलो. आता कोरोनाची लस आल्यानंतरही मास्क लावणे गरजेचे आहे, जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. लंडनमध्ये लॉकडाऊनचे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

आपण सुरक्षा आणि काळजी घेत हळूहळू सर्व गोष्टी सुरू करत आहोत. आता रात्रीच्या लॉकडाऊनची अथवा कर्फ्यूची गरज नाही, नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येकाने सावध पद्धतीने करावे, लग्नाचे आमंत्रण आप्तस्वकियांना द्या, कोरोनाला नको, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राजकीय हल्ला परतवत आरोग्य संकटांशी मुकाबला करत गेल्या वर्षभराच्या कालखंडात राज्याचा विकास केला. समृद्धी महामार्ग पूर्ण झाला, राज्याला नक्कीच आर्थिक चणचण आहे हे मान्य करावच लागेल. केंद्र सरकारकडून येणारा निधी अद्याप आला नाही त्यातून मार्ग काढत आहोत.

कोरोना महामारीच्या काळात अनेक सामंजस्य करार केले आहेत. राज्यातील गड, किल्ले, मंदिरे ही आपली संपत्ती आहे, शाळा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असून त्यासाठी पालकांच्या सहकाराची गरज आहे. आधीची कामे पुढे नेत असल्याची टीका आमच्यावर होतेय, कामाला स्थगिती द्यायची की ती कामे पुढे न्यायची हे ठरवा. एखादा प्रकल्प सुरू केला की त्याला विरोध होतो, त्यात काही बदल करावे लागतात, असे म्हणत मेट्रो कांजूरमार्गाबाबत सध्या वाद घालण्यात येत आहे.

मला अहंकारी म्हटले जाते, मी माझ्या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी अहंकारी आहे, मेट्रोसाठी कालांतराने आरेचे जंगल नष्ट झाले असते. आपण सर्वांनी आरेचे जंगल वाचवले. पुढचे पन्नास-शंभर वर्षांचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. जनतेची जमीन बिल्डरांच्या घशात न घालता ती जनतेसाठीच वापरण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकर्‍यांवर थंड पाण्याचे फवारे मारणे योग्य नसल्याचे सांगून कांजूर प्रकरण केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित बसून चर्चेने सोडवायल हवे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी म्हटले.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....