Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड केज केजची नगरपंचायत शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढणार की वेगळी?

केजची नगरपंचायत शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढणार की वेगळी?


केज (रिपोर्टर)- केज नगरपंचायतची निवडणूक जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता असून आतापासूनच स्थानिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाआघाडी आहे. ही महामआघाडी स्थानिक निवडणुकीमध्ये कायम राहणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत असून केज नरपंचायतची निवडणूक तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित निवडणूक लढवणार की वेगवेगळ्या चुली मांडणार याकडे स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.


कोरोनामुळे केज नगरपंचायतची निवडणूक अद्याप घेण्यात आली नाही मात्र जानेवारी महिन्यामध्ये निवडणुक होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणीला सुुरुवात केल्याने ही नगरपंचायत सध्या कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाआघाडीचं सरकार असून ही महाआघाडी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढवण्यासाठी एकत्र येणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ही आघाडी केज नगरपंचायतमध्ये दिसणार का, अशाही चर्चा होऊ लागल्या आहेत. गत निवडणुकीत सर्व पक्षांनी आपआपली ताकद अजमावली होती, असे असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली होती. निवडणुका कधीही घोेषीत होऊ शकतात त्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या वार्डात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.


अडीच वर्षे भोगलं नगराध्यक्षपद
केज नगरपंचायतची निवडणूक माजी खा. रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने बाजी मारली होती. यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असल्याने अडीच वर्षे नगराध्यक्षपदी कबीर इनामदार यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर अडीच वर्षे आदित्य पाटील यांची निवड झाली होती. सभापतीपद राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देण्यात आले होते.

गत निवडणुकीतील बलाबल
कॉंग्रेस ०८
राष्ट्रवादी ०२
हारुण इनामदार गट ०५
अपक्ष ०२

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....