Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड केंद्राची पीक पाहणी म्हणजे ‘बैल गेला, झोपा केला’

केंद्राची पीक पाहणी म्हणजे ‘बैल गेला, झोपा केला’


औरंगाबाद जिल्ह्यात पीक पाहणीला सुरुवात, चार महिन्यापूर्वी उद्ध्वस्त झाले खरीपाचे पीक आता शेतात पहायला काय मिळणार, २६ लाख हेक्टरमध्ये नुकसान झाल्याची अधिकृत आकडेवारी मग पाहणी दौर्‍याचा फार्स कशाला?
शेतकर्‍यांनी मशागत करून अनेक ठिकाणी रब्बीचा पेरा केला
औरंगाबाद/उस्मानाबाद (रिपोर्टर)- अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सुमारे २६ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून
जून-जुलैमध्ये शेतीचो पुर्णत: वाटोळे झाल्यानंतर आता थेट डिसेंबरमध्ये त्या पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मराठवाड्यात डेरेदाखल झाले आहे. केंद्राचा हा पाहणी दौरा म्हणजे ‘बैल गेला झोपा केला’ असाच म्हणावा लागेल. आज सकाळी केंद्राच्या या पथकाने औरंगाबादेतील निपाणा पिंपळगाव येथील
शेतीची पाहणी केली.

यावर्षी मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्याने शेतातील उभे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकर्‍यांच्या हाती पिकांसाठी केलेला खर्चही लागला नाही. केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांना मदत मिळेल, यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारने यापुर्वीच पंचनामे केले आणि त्यातून मराठवाड्यातील सुमारे २६ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. जुन-जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतातले खरीपाचे पीक पुर्णत: उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकर्‍यांनी रब्बीची तयारी केली.

अनेक ठिकाणी रब्बीचा पेराही झाला. मात्र केंद्र सरकारचे पथक आज डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात डेरेदाखल झाले आहे. काल रात्री हे पथक रमेश गंता यांच्या नेतृत्वाखाली आर.बी. कौल व ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यशपाल, आर.पी.सिंंग, तुषार व्यास, एम.एस. सहारे हे अधिकारी पाहणी करण्यासाठी आले. आज सकाळी त्यांनी औरंगाबाद येथील निपाणी पिंपळा या गावी पाहणी केली असून तेथील शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला. यातील एक पथक हे उस्मानाबाद जिल्ह्यात शेतीची पाहणी करणार आहे. केंद्र सरकारचे पीक पाहणीसाठी आलेले हे पथक म्हणजे ‘बैल गेला अन् झोपा केला’ असे असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे. या पथकाने बीड जिल्ह्यात पाहणी करण्याचे अगोदर ठरवले होते मात्र नंतर या पाहणीतूनही बीड जिल्ह्याला वगळण्यात आले.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....