Saturday, January 23, 2021
No menu items!
Home बीड धारूर चोंडी येथील मारहाणीत जखमी झालेल्या मालूराम मुंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपीवर 302...

चोंडी येथील मारहाणीत जखमी झालेल्या मालूराम मुंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल

किल्लेधारूरः( रिपोर्टर) धारुर तालुक्यातील चोंडी येथे मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या मालूराम मुंडे यांचा उपचारादरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला यामुळे धारूर पोलीस स्टेशनमध्ये यातील आरोपी वर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अपहरणाचा गुन्हा दाखल केला म्हणून फिर्यादी व त्यांच्या वडिलास काठ्या कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चोंडी येथे घडली असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी आठ जना विरूध्द धारूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.

तालूक्यातील चौंडी येथे १५ डिंसेबर रोजी फिर्यादी अशोक मालूराम मुंडे यांचे घरा समोर आरोपी विलास आण्णा मुंडे व इतर सात जन रात्री आठच्या वेळी घरा समोर येऊन तुम्ही सांगोला पोलीस स्टेशनला आमचे विरूध्द अपहरणाचा गुन्हा का दाखल केला म्हणून विचारणा केली. मालूराम मुंडे व घरातील व्यक्ती समजूत काढत असताना आरोपींनी काठ्या, कुऱ्हाडी व इतर हत्याराने मारहाण केली. या मारहाणीत मालूराम मुंडे यांना गंभीर मार लागला होता उपचार दरम्यान त्यांचा सोलापूर मृत्यू झाला

. फिर्यादी अशोक मुंडे यांला हि डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी विलास आण्णा मुंडे सह आठ जना विरूध्द गु.र.न.,302 ३२८/२०२० नुसार कलम ३०७, ३२५, ३२३, १४३, १४७, १४८ कलमा सह गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे हे करत आहेत. गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार आहेत.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...