गेवराई (रिपोर्टर) गेवराई येथे बांधकामाचे काम उरकुन मोटारसायकल वरून घरी परतत असलेल्या एकाचा टॅक्टरला धडकुन जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.२१ रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास धुळे- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपा जवळ घडली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, अशोक ज्ञानोबा बोर्डे ( वय ३० ) राहणार वडगाव ढोक ता.गेवराई हे सोमवार रोजी गेवराई शहरातील बांधकामाचे काम उरकुन सायंकाळी कामाची सुट्टी झाल्यानंतर ते आपल्या वडगाव ढोक या गावी परतत असताना ते धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपा जवळ आले असता त्याच दरम्यान एक टॅक्टर ही आले. अशोक बोर्डे यांच्या मोटारसायकलची व टॅक्टरची जोराची धडक होऊन अशोक बोर्डे हे रस्त्यावर अपटल्याने झालेल्या या अपघात अशोक बोर्डे हे जागीच ठार झाले. त्यांना पुढील उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या पार्थिव शरिराचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.