Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड थकीत कर्जदारासाठी बँकेची ऋण समाधान योजना

थकीत कर्जदारासाठी बँकेची ऋण समाधान योजना


कर्ज खाते एनपीए झाल्यापासून व्याजापासून मिळणार संपुर्ण सूट
बीड (रिपोर्टर)ः- थकीत कर्जदारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ऋण समाधान योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज खाते एनपीए झाल्यापासून व्याजामध्ये संपुर्ण सुट मिळणार आहे. सदरील या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गंगाभिषण थावरे यांनी केले आहे.

अनेक शेतकर्‍यांकडे कर्जाची बाकी आहे. अशा शेतकर्‍यांसाठी बँकेने ऋण समाधान योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज खाते एनपीए झाल्यापासून व्याजामध्ये सुट मिळणार आहे. कर्जदारास अर्ज दाखल करतांना ओटीएस रकमेच्या दहा टक्के रक्कम बँकेकडे जमा करावी लागेल. अर्ज शाखाअधिकारी यांच्यानावे असेल तसेच अर्जासोबत दहा टक्के रक्कम भरली नसेल तर अर्जाचा योजने अंतर्गत विचार होणार नाही. योजनेअंतर्गत कर्जदाराचा अर्ज मंजूर झाल्यावर मंजूर झाल्यापासून तिस दिवसाच्या आत ओटीएस रकमेच्या दहा टक्के रक्कम परत बँकेकडे जमा करावे लागेल जर ही रक्कम जमा झाली नाही तर कर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अगोदर जमा केलेली रक्कम परत मिळणार नाही.

कर्जदारास उर्वरीत रक्कम बँकेच्या सहा महिने एमसीएलआर व्याज दराप्रमाणे अर्ज मंजूर झालेल्या तारखेपासून आठ महिन्यापर्यंत भरता येईल. जर येणे प्रमाणे राहीलेली रक्कम बँकेकडे जमा न झाल्यास योजनंअर्तगत मंजूर अर्ज रद्द करण्यात येईल याचीही नोंद घ्यावी.
ऋण समाधान या २०-२१ योजनेपुर्वी इतर ओटीएस अंतर्गत भरलेल्या कोणत्याही रकमेचा परतावा किंवा समायोजन होणार नाही यासह इतर अटी यामध्ये लावण्यात आलेल्या आहे. तरी सबंधीतांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...