बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाला आज दुपारी एक वाजता ७९२ संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. या अहवालामध्ये केवळ २७ जण बाधीत आढळून आले आहेत.
बीडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज कमी जास्त प्रमाणात वाढ होत आहे. आज आलेल्या अहवालात बीड शहरात केवळ सात जण बाधीत आढळून आल्याने जिल्ह्याचा आकडा हा २७ वर थांबला. ७९२ पैकी तब्बल ७६५ जण निगेटिव्ह आले असून २७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई ४, आष्टी २, बीड ७, गेवराई, परळी प्रत्येकी ४, केज १ तर पाटोदा, शिरूर आणि वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.