Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड बीडच्या तहसील कार्यालयात सन्मान योजना राबवायला कोणी वाली आहे की नाही?

बीडच्या तहसील कार्यालयात सन्मान योजना राबवायला कोणी वाली आहे की नाही?


अनेक शेतकर्‍यांची नावे गाळली, अधिकारी, कर्मचारी शेतकर्‍यांना सन्मान देत नाहीत
कॉम्प्युटर ऑपरेटर नेट चलत नसल्याचे कारण दाखवत शेतकर्‍यांना पाठवतात परत
बीड (रिपोर्टर)- पंतप्रधान सन्मान योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. यातील काही शेतकर्‍यांची नावे प्रशासकीय अधिकार्‍यांनी वगळली असल्याने आपली नावे योजनेत लावण्यासाठी शेतकरी बीड तहसील कार्यालयातील संबंधित विभागात दररोज चकरा मारतात मात्र तेथी कर्मचारी शेतकर्‍यांचा सन्मान करत नाहीत, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात.

कर्मचारी तहसीलदारांचे नाव सांगतात तर तहसीलदार कर्मचार्‍यांकडे बोट दाखवतात. संबंधित विभागाचा ऑपरेटर आठ दिवसांपासून नेट चलत नसल्याचे कारण सांगत आहे. एकूणच तहसील कार्यालयाचा हा अनागोंदी कारभार पाहता शेतकर्‍यांत संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी सन्मान योजना घोषीत केली. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. पहिल्या वेळेस सर्व शेतकर्‍यांना याचा लाभ मिळाला मात्र त्यानंतर अनेक शेतकर्‍यांची नावे वगळण्यात आली. जे खरे शेतकरी आहेत त्यांचीही नावे कमी करण्यात आली. आपली नावे का कमी करण्यात आली, नावे पुन्हा लावण्यासाठी अनेक शेतकरी बीडच्या तहसील कार्यालयात चकरा मारतात मात्र त्यांना संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांना दाद देत नाहीत, कर्मचारी तहसीलदारांचे नाव सांगतात तर तहसीलदार कर्मचार्‍यांकडे बोट दाखवतात. जो विभाग यासाठी उभारण्यात आला आहे तेथील ऑपरेर गेल्या आठ दिवसांपासून नेट चलत नसल्याचे सांगत आहेत. तहसील कार्यालयात आठ दिवसांपासून नेट का चलत नाही ? हा प्रश्‍न उपस्थित होत असून शेतकर्‍यांचा तहसील कार्यालयात कसा अवमान होतो हे यामुळे दिसून येते. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून सन्मान योजनेतून ज्या शेतकर्‍यांची नावे कमी करण्यात आली आहेत त्यांचा समावेश योजनेत करावा व कार्यालयातील अनागोंदी कारभार थांबवावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...