Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home शेती पोस्टरबाजी भाजपाच्या अंगलट! जाहिरातीतील तो’ शेतकरीच देतोय दिल्लीत धरणे

पोस्टरबाजी भाजपाच्या अंगलट! जाहिरातीतील तो’ शेतकरीच देतोय दिल्लीत धरणे

नवी दिल्ली (वृत्तसेवा)- मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना होत असलेला विरोध अजूनही मावळलेला नाही. शेतकर्‍यांचं आंदोलन सुरूच असून, नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी भाजपाने केलेल्या जाहिरातबाजीचा फज्जा झाला आहे. भाजपाने जाहिरातीत दाखवलेला शेतकरीच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात धरणे देत आहे. त्यामुळे ही पोस्टरबाजी भाजपाच्याच अंगलट आली असून, पक्षाकडून ते पोस्टरही हटवण्यात आलं आहे.


नव्या कृषी कायद्यांना शेतकर्‍यांकडून प्रचंड विरोध होत आहे. तिन्ही कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार व भाजपाकडून तिन्ही कायद्यांचे फायदे पटवून देण्याचं काम केलं जात आहे. याचसाठी पंजाब भाजपानं हरप्रीत सिंह यांचा फोटो वापरून कायद्यांचे फायदे सांगणार पोस्टर तयार केलं आहे. यात हरप्रीत सिंह यांना सुखी शेतकरी म्हणून दाखवण्यात आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे स्वतः हरप्रीत सिंह हेच सध्या सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात धरणे देत आहेत. हरप्रीत सिंह यांच्या या पोस्टरविषयी सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरू आहे. त्या पोस्टरवरून टीका सुरू झाल्यानंतर पंजाब भाजपानं हे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केलं आहे.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....