Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home राजकारण सत्तेतली राष्ट्रवादी जनतेत, विरोधी भाजप सुस्त

सत्तेतली राष्ट्रवादी जनतेत, विरोधी भाजप सुस्त

जिल्ह्यातील १२९ ग्रा.पं.साठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात
१२९ गावांमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची लगबग
शिवसेनाही निवडणूक लढवण्यासाठी आक्रमक
कॉंग्रेसचीही तयारी
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपा कार्यकर्त्यात मात्र मरगळ

बीड (रिपोर्टर)-
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला अवकळा प्राप्त झाली. आज मितीला जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाही भाजपा नेतृत्वाच्या हालचाली दिसून येत नाही तर दुसरीकडे सत्तेत असलेले सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे लोक दरबार घेऊन जनतेत राहत असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाल्याचे दिसून येत असून महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि कॉंग्रेसही ग्रामपंचायत निवडणूक लढण्यास गावपातळीवर तयार असल्याचे दिसून येते. भाजपा कार्यकर्त्यात मात्र अद्यापही मरगळ असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावपातळीवरील निवडणुकीत १२९ गावांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या पद्धतीने फिल्डींग लावत आहे.

बीड जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली. गेल्या महिना-भरापासून गाव गाडा हाकणारे आणि हाकू पाहणारे या निवडणुकीची तयारी करत आहेत. गावपातळीवरची निवडणूक असल्याने वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची लगबग नसली तरी त्यांचा उत्साह आणि कानमंत्र गावपातळीवर कार्यकर्त्यांना आवश्यक असतो मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा नेतृत्वाला पदरी आलेल्या पराभवाने नेतृत्वाने कार्यकर्त्यांकडे अद्यापपर्यंत ढुंकून पाहितले नाही. त्यामुळे गावपातळीवर भाजपाच्या कार्यकर्त्यात निवडणूक लढवण्याबाबत तेवढा उत्साह दिसून येत नाही. दुसरीकडे सत्तेत असले तरी सातत्याने जमीनीवर राहत जनतेत राहून त्यांचे प्रश्‍न सोडवणारे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यप्रणालीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना उर्जा मिळत असल्याने ते कार्यकर्ते या निवडणुकीत उत्साही असल्याचे दिसू नयेत आहे. जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अग्रेसर असल्याचे दिसते त्यापाठोपाठ शिवसेना आणि कॉंग्रेसही तेवढ्याच तयारीत दिसून येत आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप मात्र या ठिकाणी मरगळलेल्या अवस्थेत पहावयास मिळत असल्याने भाजपाचे गावपातळीवरील कार्यकर्त्यांना नेमकं काय करायचं? हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया कार्यकर्तेच देत आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या वर्षभरापासून बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधला नसल्याने नेतृत्व आणि कार्यकर्त्यात दुरी वाढत असल्याचे कार्यकर्तेच आता बोलून दाखवत आहेत.

सरपंच पदाची सोडत रद्द
खर्च कोणी करायचा?

१२९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी सरपंचपदाची सोडत काढण्यात आली होती मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे आरक्षण रद्द केल्याने आता गावपातळीवर पॅनल कोणी उभा करायचा, या निवडणुकीचा खर्च कोणी करायचा? या प्रश्‍नचिन्हात अनेक जण दिसून येत असल्याने म्हणावा तेवढा उत्साह या निवडणुकीमध्ये पहायला मिळत नाही.

ग्रामपंचायत निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराला राष्ट्रीयकृत बँक खात्यातून खर्च बंधनकारक

येत्या १५ जानेवारीला जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यंदा निवडणूक लढवताना त्यांनी आपले नव्याने बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेतून उघडून त्यातूनच निवडणूक खर्च करावा, असे आदेश संबंधित तहसीलदारांना जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.
महायुती सरकारच्या काळात ग्रामपंचायत सरपंचपदासाठी जनतेतून थेट निवडणूक झाली होती. मात्र आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पहिल्या पद्धतीनेच सदस्यातून सरपंचाची निवड करण्याचे आदेश दिले. बीड जिल्ह्यातही येत्या १५ जानेवारीला १२९ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. केंद्रीय निधी आणि राज्य सरकारचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीला खूप मोठे महत्व आले आहे. ग्रा.पं.सदस्य यांना निवडणुक लढवताना जो निवडणूक खर्च करावा लागतो तो नव्याने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यातूनच निवडणूक खर्च करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार, ग्रा.पं. निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित बँक व्यवस्थापकांना दिले.

मुश्रीफांच्या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचीका
राज्यातील ग्रामपंचायत, सरपंचपदाची आरक्षण सोडत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रद्द केल्यानंतर या प्रकरणी सदरचा निर्णय हा घटनात्मक दृष्ट्या अवैध असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गंगापूर तालुक्यातील भेंडा येथील विक्रम गोकुळ यांनी याचीका दाखल केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे घटनेच्या अनुच्छेद १४ चा भंग होतो असे म्हटले आहे. या याचिकेवर ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...