Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home क्राईम चंपावती क्रीडा मंडळाच्या स्विमींग कोचची आत्महत्या

चंपावती क्रीडा मंडळाच्या स्विमींग कोचची आत्महत्या


बीड (रिपोर्टर)- शहरातील चंपावती क्रीडा मंडळ येथे कोच म्हणून असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिलहा रुग्णालयात दाखल केला. आत्महत्या नेमकी का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.


शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चंपावती क्रीडा मंडळ येथील बाथरुममध्ये स्विमिंग कोच अक्षय राजू कांबळे (वय २२, रा. बीऍण्डसी क्वॉर्टर पालवण चौक बीड) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस हवालदार गणेश परझने, रविंद्र राऊत यांनी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. अक्षय कांबळे हा तरुण चंपावती क्रीडा मंडळातच राहत होता. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही. राहुल सुर्यकांत झंपलवार यांच्या खबरीवरून शिवाजीनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...