Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home क्राईम धमकी देणार्‍या दोन वाळू तस्करांविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धमकी देणार्‍या दोन वाळू तस्करांविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर)- वडवणी तालुक्यातील देवडी येथील वाळू तस्कर गोविंद झाटे व गितेश आगे या दोघांनी संग्राम धनवे यांना धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम संभाजी धनवे यांना काही दिवसांपूर्वी गोविंद झाटे व गितेश आगे या दोघांनी धमकी दिली होती. या प्रकरणी धनवे यांनी वडवणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने त्यानुसार कलम ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनवे यांनी मोबाईलवरून वाळुचे चित्रीकरण केले होते. त्यामुळे त्यांच्यावर सुड उगवण्याच्या उद्देशाने त्यांना धमकवण्यात आले होते. आमच्या नादी लागू नको, यासह अन्य धमकी वजा इशारे देत संबंधीताने धनवे यांना शिवीगाळ केली होती.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....