बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील ५ लाखांपेक्षा मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यात ऊसतोडणी जातात. बहुतांश मजूर आपल्या पाल्यांना सोबत घेऊन जातात. वडवणी तालुक्यातील कोठरबण येथील एक १६ वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत हुबळी येथील कारखान्यावर गेला होता. त्याठिकाणी त्याचा आजार उद्भवल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सतीश चांगदेव मुंडे (रा. कोठरबण ता. वडवणी) हा १६ वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत कर्नाटक राज्यात असलेल्या हुबळी येथील कारखान्यावर गेला होता. त्याठिकाणी गेल्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान सदरील मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.