ग्रामपंचायत निवडणूक लढवणार्या उमेदवारांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सोय
बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने राखीव प्रवर्गातून उमेदवारी दाखल करणार्या उमेदवारांसाठी जात पडताळणीचा प्रस्ताव दाखल केला आहे, अशी पावती अर्जासोबत जोडली तर तो अर्ज टिकतो. म्हणून शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने जिल्हा जात पडताळणी कार्यालय सुरू आहे.
कालपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवणार्या उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले आहे. या ग्रामपंचायतींना इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती या राखीव प्रवर्गातून सरपंच पद किंवा ग्रामपंचायत सदस्य यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी केलेला जातीचा दाखला किंवा जात पडताळणी प्रस्ताव दाखल केल्याची पावती उमेदवारी अर्जासोबत जोडली तर तो अर्ज टिकतो म्हणून सलग तीन दिवस सुट्ट्या असतानाही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने बीड येथील जात पडताळणी कार्यालय सुरू आहे.