Saturday, January 23, 2021
No menu items!
Home देश विदेश आंदोलकांच्या प्रश्नांना शेतकर्‍यांच्या तोंडून उत्तर देण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न

आंदोलकांच्या प्रश्नांना शेतकर्‍यांच्या तोंडून उत्तर देण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न


बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. प्रीतम मुंडेंच्या उपस्थितीत मोदींच्या दूरसंवाद कार्यक्रमाचे श्रवण
नवी दिल्ली/बीड (रिपोर्टर)- राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायद्या विरोधातील शेतकरी आंदोलनाचा आजचा २९ वा दिवस असून कृषी कायद्याचे फायदे पटवून देण्यात आणि शेतकर्‍यांचा सन्मान करण्यास मोदी सरकार आतापर्यंत प्रयत्न करत असून त्याला अद्याप यश आले नाही. आज दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकर्‍यांसोबत डिजिटल माध्यमाद्वारे संवाद साधत असून आंदोलकांच्या प्रश्‍नांना शेतकर्‍यांच्या तोंडून उत्तर देण्याचा पंतप्रधानांचा हा प्रयत्न आहे. मराठवाड्यातून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या मातोळा येथील गणेश भोसले यांनी पंतप्रधानांसोबत संवाद साधला तर बीडमध्ये खा. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरसंवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होते.

गेल्या २९ दिवसांपासून राजधानी दिल्लीत मोठ्या कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम असून शेतकर्‍यांचं मन वळवण्यात अद्यापपर्यंत मोदी सरकारला यश आले नाही. त्यामुळे आता दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले असून माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील ९ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर १८ कोटी रुपये आज देण्यात येत आहे तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकर्‍यांसोबत संवादही साधत आहेत. सहा राज्यातील शेतकर्‍यांसोबत ते संवाद साधत असून महाराष्ट्रातून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला. लातूर जिल्ह्यातून गणेश राजेंद्र भोसले यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. गणेश भोसले हे औसा तालुक्यातील मातोळा गावातील रहिवासी आहेत. ’माझ्याकडे ३ हेक्टर जमीन असून सोयाबीन, तूरीचं पीक घेतो. आपल्याकडे नऊ गाय, १३ म्हशी आहेत’, असं यावेळी भोसले यांनी म्हटलं. पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता का? असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. २०१९ साली पंतप्रधान पीक योजनेत २५८० रुपयांचा प्रिमियम भरला होता. परंतु, पावसामुळे सोबयाबीनच्या पिकाचं नुकसान झालं. त्यामुळे मला ५४,३१५ रुपयांची मदत ’पंतप्रधान पीकविमा योजने’द्वारे मिळाल्याचं, भोसले यांनी म्हटलं.


’पंतप्रधान किसान सन्मान निधी’चं वितरण नरेंद्र मोदींनी एक बटन दाबून डिजिटल पद्धतीनं केलं. याद्वारे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ९ कोटी ४ लाख शेतकर्‍यांना १८ हजार ९८ कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात थेट दाखल करण्यात आले. या कार्यक्रमाचं संचालन कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हाताळलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी हेदेखील वेगवेगळ्या स्थानांवरून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासहीत सर्व केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार या कार्यक्रमात उपस्थित आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरसंवाद कार्यक्रम ऐकण्यासाठी बीड तालुक्यातील काही शेतकरी आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...