Saturday, January 23, 2021
No menu items!
Home बीड बांधकाम विभागही आता प्रभारीवर

बांधकाम विभागही आता प्रभारीवर


बीड (रिपोर्टर)- महसूल आणि जिल्हा परिषदेचे काही अधिकारी आणि कर्मचारी प्रभारी असतात. मात्र कोणताही सत्ताधारी पक्ष महत्वाच्या असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यकारी अभियंता प्रभारी ठेवत नाहीत. मात्र बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे प्रभारी आहेत. त्यासोबत महत्वाच्या अशा जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंताही प्रभारी अधिकार्‍यावर प्रशासनाचा गाडा चालवत आहेत.


कोणताही सत्ताधारी पक्ष कार्यकारी अभियंता या पदावरील व्यक्ती आपल्या मर्जीतला आणतात. सोबत हे पद कधीही रिक्त ठेवत नाहीत. बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सानप यांची बदली झाल्यानंतर तब्बल सात महिन्यांपासून कार्यकारी अभियंता या पदाचा पदभार अधीक्षक अभियंता उस्मानाबाद या कार्यालयातील झगडे यांच्याकडे प्रभारी आहे. त्यामुळे बांधकाम विभागातील सर्वच कामे खोळंबलेली आहेत. पंधरा-पंधरा दिवस झगडे हे बीड येथे फिरकत नाहीत. त्यासोबतच जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता पद हेही गेल्या सात-आठ महिन्यांपासून रिक्त असून या पदाचा अतिरिक्त पदभार बांधकाम विभाग क्र. १ येथे हाळीकर यांच्याकडे दिलेला आहे. त्यामुळे याही विभागाचा कारभार ढेपाळलेला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी रिक्त असलेली अधिकार्‍यांची पदे भरण्यात यावीत, अशी मागणी सरपंचासोबत गुत्तेदारांकडून होत आहे.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...