Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home बीड बांधकाम विभागातील विशेष घटक योजनेतील निधी जातो कुठे?

बांधकाम विभागातील विशेष घटक योजनेतील निधी जातो कुठे?


बीड (रिपोर्टर)- जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्याप्रमाणे दलित वस्ती सुधारण योजनेअंतर्गत रस्ता, नाली आणि इतर कामे केली जातात त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विशेष घटक योजनेअंतर्गत हा निधी मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये खर्च करण्यात येतो मात्र अपवादात्मक प्रकार सोडले तर हा निधी खर्च झाल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच हुशार आहेत त्यांच्यातून या निधीबाबत कुजबुज सुरू आहे. हा निधी जातो कुठे ? असा प्रश्‍न विचारला जातोय.
राज्य शासनाच्या सामाजीक न्याय विभागातर्ंगत प्रत्येक शासकीय कार्यालय अंतर्गत विशेष घटक योजना या अंतर्गत निधी दिला जातो. त्या त्या शासकीय कार्यालयांनी विशेष घटक योजनेअंतर्गत अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. कृषी विभागाकडून अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकर्‍यांना विहीर आणि इतर औजारे दिली जातात. पशूसंवर्धन विभागाकडून गाई, म्हशी आणि शेळ्या दिल्या जातात त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विशेष घटक योजनेअंतर्गत दिलेल्या निधीतून गाव पातळीवरील मागासवर्गीयांच्या वस्तीमधील रस्त्यांची कामे करावीत, असा शासकीय पायंडा आहे मात्र हा निधी आमदाराच्या शिफारशीनुसारच देण्याचा प्रघात असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपुर्वी आमदार हे आपआपल्या कार्यकर्त्यांना मजुर संस्था आणि गुत्तेदारीचे लायसेन्स असणार्‍या कार्यकर्त्यांना देतात. काही कामे केली जात होती तर काही कामे ही कागदोपत्रीच दाखविली जायची मात्र आता सरपंच हे अधिक चौकस बुद्धीचे असल्याने त्यांच्याकडून या विशेष घटक योजनेंतर्गतचा निधी जातो कुठे? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...