Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home क्राईम पंचरत्न हॉटेल फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पंचरत्न हॉटेल फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात


बीड (रिपोर्टर)- माजलगाव शहरातील हॉटेल पंचरत्न येथे पुर्वी कामाला असलेल्या अल्पवयीन कामगारानेच रात्री चोरी करून ६० हजार रुपयांसह दोन मोबाईल लंपास केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करत काल अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन मोबाईलसह नगदी रक्कम जप्त केली आहे.

माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील एक १७ वर्षाचा मुलगा हॉटेल पंचरत्न येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कामाला होता. त्याने ते काम सोडले होते. त्यानंतर दि. १६ डिसेंबर रोजी रात्री हॉटेल बंद केल्यानंतर त्याने हॉटेलचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करत गल्ल्यातील ६० हजार रुपये व दोन मोबाईल चोरले होते. काल पीएसआय जोंधळे, पोलिस हवालदार तुळशीराम जगताप, विकास वाघमारे, गायकवाड, सायबर सेलचे सलीम शेख, निलेश ठाकूर यांनी शिंदेवाडी गावात जावून त्या अल्पवयीन आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेत त्याच्याकडून दोन मोबाईल आणि नगदी २८ हजार ८०० रुपये ताब्यात घेतले. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष जोंधळे यांनी केली.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...