Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड वाळू महाग झाल्याने सर्वसामान्यांना बांधकाम करणे झाले मुश्कील

वाळू महाग झाल्याने सर्वसामान्यांना बांधकाम करणे झाले मुश्कील


महसूल विभाग वाळू माफीयांच्या मुसक्या आवळण्यास अपयशी
बीड (रिपोर्टर)ः- वाळूचे दरवर्षी टेंडर काढले जात नसल्याने वाळू माफीया चोरुन नदी पात्रातून वाळू उपसतात आणि ती वाळू अगदी चढया भावाने विक्री करतात. आज टिप्परचा भाव ४० ते ५० हजारापर्यंत गेला आहे. इतक्या महागाची वाळू खरेदी करणं सर्वसामान्य बांधकाम करणार्‍या नागरीकांना परवडत नाही. वाळूचा टेंडर निघाले तर वाळूचे इतके भाव वाढत नाही. मात्र महसूल विभाग टेंडर का काढत नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आज वाळूत माफीया मात्र चांगलाच हात धोवून घेत आहे. यात काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी मलिदा लाटण्याचे काम करु लागले.


बीड जिल्ह्यातील लहान मोठ्या नदी पात्रातून वाळूचा अनाधिकृत उपसा केला जातो. या उपसाकडे जाणीवपुर्वक महसूल विभाग दुर्लक्ष करतयं याचा कारण वाळू माफीया स्थानीक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना हाताशी धरुन वाळूचा उपसा करत असतात. स्वतःचा फायदा करत अधिकार्‍यांचा आणि कर्मचार्‍यांचा फायदा करत असल्याने वाळू माफीयांवर अधिकारी कारवाई करत नाही. नियमानूसार दरवर्षी टेंडर निघाले तर वाळूचा अव्वा ते सव्वा भाव होत नाही. आज सर्वसामान्यांना वाळू खरेदी करणे त्याचा अवाक्याच्या बाहेर गेलं आहे. ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत टिप्परचा भाव आहे. काही ठिकाणी यापेक्षाही जास्त भावाने विकली जाते. याला सर्वस्वी महसुल विभाग जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. वाळू माफीयांनी गोदावरी, सिंदफना यासह जिल्ह्यातल्या अन्य नदीच्या पात्रात व काही परिसरामध्ये वाळूचा साठा करुन ठेवलेला आहे.साठा करुन ठेवलेली वाळू चोरुन विकली जाते. वाळू कुठून उपसली जाते ? कोण उपसतयं याची इत्यभूत माहिती संबंधीत महसूल अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना असते मात्र ते याबाबत कुठलीही भूमीका घेत नाही. सर्वसामान्यांनी वाळूचे वाढलेले भाव पाहता आपले बांधकाम ठप्प केलेले आहे.

घरकूलाचे
बांधकाम रखडले

शहरी भागासह ग्रामीण भागात शासनाच्यावतीने दरवर्षी घरकूल मंजूर केले जातात. या घरकूलाची कामे काही ठिकाणी सुरू आहे तर काही ठिकाणी वाळू अभावी संबंधीतांनी बंद ठेवलेले आहे. घरकूल बांधण्यासाठी शासन ग्रामीण भागात १ लाख २५ हजारापर्यंत देत आहे. तर शहरी भागात २ लाख ४० हजार देत आहे. वाळूचा आणि घरकुलाचे मिळणारे अनूदान याचा विचार केला तर घरकूल बांधायला बिलकूल परवडत नाही. त्यामुळे घरकूलाचे बांधकाम रखडले असून प्रशासनानेच घरकूलासाठी वाळू उपलब्ध करुन दयावी.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...