Saturday, January 23, 2021
No menu items!
Home बीड आजपर्यंत ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी

आजपर्यंत ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी


बीड (रिपोर्टर)- गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जिल्ह्यातील कापूस उत्पादन कमी होण्याचा अंदाज असून आजच्या तारखेमध्ये पणन महासंघाच्या वतीने २२ जीनिंगद्वारे ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून या चालू हंगामात १५ लाख क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी होईल. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात कापूस उत्पादन कमी होण्याचा अंदाज पणन महासंघाने व्यक्त केला आहे.


गेल्या वर्षी पणन महासंघाच्या वतीने १८ लाख १४ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती मात्र यावर्षी परतीच्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. कापसाच्या शेतामध्ये पाणी साचल्याने कापसाचे पीक हातचे गेले आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेळेवर पाऊस झाल्याने यावर्षी कापसाचे उत्पादन जास्त झाले असते मात्र तसे झाले नाही. जिल्हाधिकारी यांनी पणन महासंघाला कृषी विभागाचे १६ ग्रेडर उपलब्ध करून दिल्याने आजच्या तारखेमध्ये पणन महासंघाच्या २२ जीनिंग सुरू आहेत. आणखी किमान दोन ते तीन जीनिंग येत्या दोन दिवसात सुरू होतील. २२ जीनिंगच्या वतीने आजच्या तारखेमध्ये १४ क्विंटल कापूस खरेदी केलेला आहे. यावर्षी या जीनिंग ४ डिसेंबरला सुरू झाल्या. वास्तविक पाहता कापसाचे उत्पादन लवकर निघण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या जिनिंग किमान १५ जूनला सुरू झाल्या असत्या तर शेतकर्‍यांना आपला कापूस खासगी व्यापार्‍यांना बेभाव घालून तोटा सहन करावा लागला नसता.

मात्र बी-बियाणे खत आणि औषधाचे पैसे देण्यासाठी जीनिंग सुरू होण्याची वाट बघत या शेतकर्‍यांना बेभाव खासगी व्यापार्‍याला कापूस घातला. शासकीय कापसाचा दर हा ५ हजार ५०० ते ५ हजार ८०० असा आहे मात्र व्यापार्‍यांनी हा कापूस ४ हजार २०० ते ४ हजार ८०० च्या दराने खरेदी केला. असे असे असले तरी या वर्षी परतीच्या पावसाने कापसाचे नुकसानच झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ लाख क्विंटल कापूस कमी पणन महासंघाला खरेदी होणार आहे.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...