वडवणी (रिपोर्टर):- महामंडळाच्या एस.टी. बसमधून प्रवास करत आसताना बँगमधील मोबाईल आणि दागिने चोरणारा चोरटा पकडला असून सरदरील चोरट्याची कोरोना चाचणी केली आसता तो पॉंझिटिव्ह निघाला असल्याने एकच खळबळ झाली होती.
माजलगांव तालुक्यातील बाभळगांव येथील रहिवाशी असणारे दिंगाबर हरिभाऊ गाडेकर व त्यांच्या पत्नी हे दि.२५ रोजी पुणे ते परळी या एस.टी.बसमधून प्रवास करत असताना बीड येथील बार्शीनाका ते तेलगांव नाका या दरम्यान एका २८ वर्षीय चोरट्याने बँगमधील सॅमसंग कंपनीचा मोबाईल व दोन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. सदरील चोरट्याचे नाव राहुल वामन पवार (रा.वडीवाड तांडा ता.धारुर) असून त्याला वडवणी पोलीसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. दिंगाबर गाडेकर यांच्या फिर्यादीवरुन गु.र.नं.२६१/२०२० कलम ३७९ भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करुन काल सदरील आरोपीची कोरोनाची अँन्टीजन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये तो कोरोना पॉंझिटिव्ह आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.