Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड मोटारसायकल चोरणार्‍या दोघांसह तीन मोटारसायकल केल्या जप्त एलसिबीची कारवाई

मोटारसायकल चोरणार्‍या दोघांसह तीन मोटारसायकल केल्या जप्त एलसिबीची कारवाई


बीड (रिपोर्टर)- नवीन दुचाकी चोरणार्‍यांचे प्रमाण वाढले असून दुचाकी चोरट्यांचा शोध लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पावले उचलली आहेत. काल दुचाकी चोरणार्‍या दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी अन्य दोन दुचाकीही चोरल्याचे सांगितले. त्या दोन्ही दुचाकी पोलिसांनी काल जप्त करत आरोपींना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले.


स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. नवले हे केज, नेकनूर, युसुफवडगाव हद्दीत आपल्या पथकासह आरोपीचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की, मधुकर गणपत काळे (रा. सावळेश्वर पैठण ता. केज) व देवीदास बन्सी काळे (रा. बनसारोळा ता. केज) हे दोघे चोरीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल घेऊन नांदूरफाटा येथे आले आहे. या माहितीवरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सदरील मोटारसायकल ही येळंबघाट येथून चोरली असल्याचे पोलिसांना सांगितले. या संदर्भात नेकनूर येथे पोलिसांनी खात्री केल्यानंतर नेकनूर येथे या प्रकरणी कलम ३७९ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.

त्यानंतर चोरट्यांना पोलिसांनी अधिक विश्‍वासात घेऊन विचारले असता त्यांनी लातूर येथून एक मोटारसायकल व दिंद्रुड येथून एक मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या. सदरील कामगिरी ही पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नवले, पो.हे.कॉ. उबाळे, खेडकर, शेख, बांगर, गायकवाड, गर्जे, वंजारे यांनी केली.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....