बीड (रिपोर्टर)- पाचेगाव येथील पीडिता गावकर्यांना धमकावत असल्याचा आरोप करत सदरील महिलेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकर्यांची असून ही मागणी घेऊन ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आले होते. या वेळी पीडिताही त्या ठिकाणी आली होती. पीडिता आणि गावकर्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी पाचेगाव येथील बलात्कार प्रकरणातील चौघा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. यातील पीडिता गावातच राहत आहे. ही पीडिता गावकर्यांना धमक्या देत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला असून पीडितेवर कारवाई करावी, यासाठी काही ग्रामस्थ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आले होते. या वेळी सदरील पीडिताही त्या ठिकाणी दाखल झाली होती. पीडिता आणि गावकर्यात वादविवाद सुरू झाल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी पीडिता आणि गावकर्यांना समजाण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधीक्षकांनी पीडिता आणि काही गावकर्यांना चर्चेसाठी बोलावून घेतले होते.