बीड (रिपोर्टर)- बांधकाम कामगारांना घरासाठी अर्थसहाय्य मिळाले नसल्याने कामगारांचे आज कामगार कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. सदरील हे आंदोलन असंघटित मजदूर पंचायत या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
बांधकाम कामगारांना कामगार कल्याण कार्यालयाकडून २ लाख रुपये अर्थसहाय्य घर बांधण्यासाठी मिळालेले नाही. यापुर्वी अनेक वेळा तगादा लावूनही याची दखल संबंधित विभाग घेत नसल्याने आज संघटनेच्या वतीने कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी राजकुमार घायाळ, नवनाथ नाईकवाडे, शेरजमा खान पठाण यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.