Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home बीड जिल्हा उद्योग केंद्र उरले नावापुरतेच

जिल्हा उद्योग केंद्र उरले नावापुरतेच


बीड (रिपोर्टर)- गेल्या वीस वर्षांपुर्वी बीड शहर आणि जिल्ह्यामध्ये उद्योगाची भरभराट करणार्‍या जिल्हा उद्योग केंद्राला टाळे लागण्याची स्थिती निर्माण झाली असून तब्बल दोन वर्षांपासून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्या कार्यालयाला कुलुप आहे. या कार्यालयामध्ये नावापुरतेच तीन कर्मचारी असून एक महाव्यवस्थापक प्रभारी आहेत ते आठवड्यातून एक दिवस तेही एका तासासाठी येऊन गायब होतात. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्राचे अस्तित्व नावालाच उरले आहे.


जिल्ह्यातील उद्योगधंद्यांची उभारणी आणि कर्जपुरवठा जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय या दोन कार्यालयांमार्फत केली जाते. गेल्या वीस वर्षांपुर्वी राज्यातील उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार ज्या बीड जिल्ह्याने मिळवून दिला त्याच बीड जिल्ह्याचे जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय कागदावरच उरल्याचे दिसून येत आहे. या कार्यालयामार्फत बीड जिल्हा येथील भुखंडाचे वाटप, उद्योगासाठीची सामग्री, प्रशिक्षण आणि कर्जपुरवठा केला जात होता. बीड जिल्हा उद्योग केंद्राने ज्या उद्योगासाठी भुखंड उपलब्ध करून दिले त्या ठिकाणी बोटावर मोजण्या इतके उद्योग सोडले तर सर्वांनी या भुखंडाची राहण्यासाठी वसाहत तयार केली आहे जे की कायद्याने गुन्हा आहे. बीज भांडवल योजना, प्रशिक्षण योजनेसह पंतप्रधान रोजगार निर्मिती आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या चार योजना या कार्यालयामार्फत राबवत असताना बीज भांडवल योजनेला गेल्या पाच वर्षांमध्ये निधी उपलब्ध झालेला नाही, प्रशिक्षणही होत नाहीत, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या दोन योजनेचे प्रस्ताव ऑनलाईनद्वारे सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून मागवले जातात मात्र बँकांची उदासिनता असल्यामुळे फार काही या योजनांना यश येत नाही. त्यात भरीस भर म्हणून कधी औरंगाबाद येथील महाव्यवस्थापक तर कधी जालना येथील महाव्यवस्थापकाला जिल्हा उद्योग केंद्राचा अतिरिक्त पदभार दिला जातो.

या ठिकाणी लिपीक, उद्योग निरिक्षक, जनरल मॅनेजर आणि महाव्यवस्थापक असा भला मोठा कर्मचार्‍यांचा स्टाफ असताना आज फक्त या ठिकाणी उद्योग निरीक्षक दोन आणि महाव्यवस्थापक प्रभारी असे तीनच प्रभारी उरलेले आहेत. जनरल व्यवस्थापक, लिपीक हे पदे शासनाने लॅप्स केले की भरलेच नाही कळायला मार्ग नाही. त्यामुळे बीड येथील जिल्हा उद्योग केंद्र हे कार्यालय नावापुरतेच उरले की काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...