अतिक्रमण थांबवावे म्हणून मागणी करण्यास गेलेल्या ‘वंचित’च्या पदाधिकार्यास घेतले ताब्यात
बीड/केज (रिपोर्टर)- लाडेगाव येथील ७४ एकर मधील अतिक्रमण हटाव मोहिमेस आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली. सदरील हे अतिक्रमण हटवू नये अशी मागणी घेऊन ‘वंचित’चे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. या वेळी गोंधळ निर्माण झाल्याने पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हायकोर्टाच्या आदेशानुसार केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान जमीनीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदरील या अतिक्रमण हटाव मोहिमेचा तेथे विरोध करण्यात आला होता. हे अतिक्रमण हटवू नये, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. या बाबतचे निवेदन देण्यासाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगरसह आदी पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते. या वेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.