Friday, January 22, 2021
No menu items!
Home क्राईम फरार दरोडेखोराच्या एलसीबीने उस्मानाबादेत आवळल्या मुसक्या

फरार दरोडेखोराच्या एलसीबीने उस्मानाबादेत आवळल्या मुसक्या


केज तालुक्यात 2006 साली पडला होता दरोडा
केज (रिपोर्टर)- केज तालुक्यामध्ये 2006 साली दरोडा पडला होता. त्यामध्ये एकजण ठार झाला होता. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. सदरील हा दरोडेखोर वाशी तालुक्यातील घाटपिंप्री येथे असल्याची माहिती एलसीबीला झाल्यानंतर एलसीबीने काल त्याच्या मुसक्या आवळल्या.


केज येथील बीड रोडवर 2006 साली दरोडा पडला होता. यात एक जण ठार झाला होता. या प्रकरणी जितेंद्र बाबुशा भोसले (वय 50 वर्षे) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. हा दरोडेखोर पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता तो घाटपिंप्री येथे असल्याची माहिती एलसीबीला झाल्यानंतर मोठ्या शिताफीने त्याला काल दुपारी ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एलसीबीचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखील एपीआय आंदन कांगुणे, एपीआय उबाळे, नसीर शेख, युनुस बागवान, गर्जे यांनी केली.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...