Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home बीड अर्ज भरण्याची शेवटची तारीख इच्छुकांची तहसील कार्यालयात तोबा गर्दी

अर्ज भरण्याची शेवटची तारीख इच्छुकांची तहसील कार्यालयात तोबा गर्दी


बीड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसाठी 230 अर्ज दाखल, उद्या आणि परवा अर्जाची होणार छाननी, अद्याप एकही ग्रा.पं.बिनविरोध नाही
बीड (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच जिल्हाभरातील तहसील कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. दुपारपर्यंत केज येथे 255 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते तर आष्टी येथे शंभरपेक्षा जास्त अर्ज आले होते. बीड तालुक्यातील 29 ग्रा.पं.साठी कालपर्यंत 230 अर्ज आलेले होते. जिल्हाभरातील एकूण अर्जांची संख्या हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा दोन दिवस अर्जाची छाननी होणार आहे. एकही ग्रा.पं. अद्यापपर्यंत बिनविरोध निघालेली नव्हती.


बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषीत झाल्यापासून गावपातळीवरचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी गाव पुढार्‍यांमध्ये स्पर्धा असते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती त्यामुळे इच्छुकांनी सकाळपासूनच तहसील कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. केज तालुक्यामध्ये 23 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असल्याने आज दुपारपर्यंत 255 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले तर आष्टी येथे 12 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून दुपारपर्यंत शंभरपेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत. बीड तालुक्यातील 29 ग्रा.पं.साठी कालपर्यंत 230 अर्ज आलेले होते. जिल्हाभरातील 129 ग्रा.पं.साठी हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा अर्जांची छाननी होणार आहे. ग्रा.पं. बिनविरोध काढण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो मात्र अद्यापपर्यंत एकही ग्रामपंचायत बिनविरोध निघालेली नव्हती.

बीडच्या तहसील कार्यालयात इच्छुकांची जत्रा
बीड तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत तेथील इच्छुक सकाळपासूनच तहसील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी आलेले होते. तहसील कार्यालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरुप असल्याचे दिसून आले. 50 टक्के महिलांसाठी आरक्षण असल्याने महिला उमेदवारांचीही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती दिसून आली.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...