Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईसंजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट!

संजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट!

मुंबई : एरव्ही मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेणारे ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा घेणार आहे. आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर रविवारी (4 ऑक्टोबर) दोघांची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याचं समजतं.

तर संजय राऊत यांनी ‘मेट कुणाल कामरा टुडे’ एवढंच कॅप्शन देत त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

येत्या शुक्रवारी ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्ट मुलाखतीचं चित्रीकरण पार पडणार आहे. या मुलाखतीआधी काल म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी दोघांची भेट झाली. त्या भेटीचा फोटो संजय राऊत आणि कुणाल कामरा या दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना कुणाल कामराने ‘शट अप या कुणाल 2.0’ असं कॅप्शन दिलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!