बीड (रिपोर्टर)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शेख महेबूब यांच्यावर राजकीय द्वेषापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी सय्यद शाकेर अहमद यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शेख महेबूब हे सर्वसामान्य चेहरा मोठ्या पदावर जात असताना ते अनेकांना खटकत आहे. राजकीय द्वेषापोटीच त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे. त्यांना बदनाम करण्याचा हा जाणीवपुर्वक प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेकापचे सय्यद शाकेर, मुर्तुजा खान, सऊद चाऊस, शेख रमीज, तरबेज आलम, शेख रिजवान, बबलू मेंबर सह आदींनी केली आहे.